आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्ती:श्रावण मासात करावी पारद शिवलिंगाची पूजा, यामुळे दूर होऊ शकतात घरातील विविध वास्तुदोष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पारद शिवलिंगाला मानले जाते साक्षात महादेवाचे स्वरूप, पूजेने मिळते अक्षय पुण्य

महादेवांचा प्रिय श्रावण मास सुरु झाला आहे. या महिन्यात पारद शिवलिंगाची विशेष पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार धातूचे छोटेसे शिवलिंग घरात ठेवावे. धातूंमध्ये पारद म्हणजे पारा हा द्रवरूपात असतो आणि याचेही शिवलिंग बनवले जाते. पारद शिवलिंग घरामध्ये ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. येथे जाणून घ्या पाऱ्यापासून निर्मित शिवलिंगाच्या काही खास गोष्टी...

लिंगकोटिसहस्त्रस्य यत्फलं सम्यगर्चनात्।
तत्फलं कोटिगुणितं रसलिंगार्चनाद् भवेत्।।
ब्रह्महत्या सहस्त्राणि गौहत्याया: शतानि च।
तत्क्षणद्विलयं यान्ति रसलिंगस्य दर्शनात्।।
स्पर्शनात्प्राप्यत मुक्तिरिति सत्यं शिवोदितम्।।

अर्थ - लाखो-कोटी शिवलिंगाची पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फळ पारद शिवलिंगाची पूजा आणि दर्शन केल्याने प्राप्त होते. पारद शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने सर्व पापातून मुक्ती मिळते.

कसे तयार होते पारद शिवलिंग
पारद शिवलिंग तयार करणे खूप अवघड काम आहे. सर्वात पहिले पारा शुद्ध केला जातो. त्यानंतर विविध औषधी मिसळून द्रवरूप पाऱ्याचे बंधन केले जाते म्हणजे ठोस बनवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 6 महिने लागतात, त्यानंतर पारद शिवलिंग तयार होते.

घरामध्ये किती मोठे शिवलिंग ठेवावे
देवघरात ठेवण्यात येणाऱ्या शिवलिंगाचा आकार आपल्या अंगठ्यापेक्षा अधिक असू नये. शिवलिंग खूप संवेदनशील असते, यामुळे घरात अधिक मोठे शिवलिंग ठेवू नये. तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग ठेवणे टाळावे.

बातम्या आणखी आहेत...