आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान विष्णू आणि पितृ पूजेचा दिवस:वैशाख पौर्णिमेला पिंपळाची पूजा केल्याने दूर होतात समस्या, पितरांनाही मिळते संतुष्टी

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख मासातील पौर्णिमेला पिंपळ पैर्णिमा असेही म्हणतात. कारण या दिवशी पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा करण्याचे विधान ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. स्कंद, पद्म और आणि श्रीमद्भागवत महापुराणनुसार या झाडामध्ये सर्व देवी-देवतांचा आणि पितरांचा वास मानला गेला आहे. यासोबतच असे मानले जाते की, पिंपळ श्रीविष्णूंचे जिवंत आणि पूर्णतः मूर्तीमान स्वरूप आहे.

श्रीकृष्ण आणि पितरांना तृप्त करण्याचा दिवस
पौर्णिमेला पितरांसाठी केलेल्या पूजेने पितरांची तृप्ती तर होतेच, शिवाय भगवान श्रीविष्णूची कृपाही प्राप्त होते. त्यामुळे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला पिंपळाची पूजा करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भागवतात सांगितले आहे की, पिंपळ हे त्यांचेच रूप आहे. या कारणास्तव पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. त्यामुळेच पिंपळाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. याला अश्वथ असेही म्हणतात.

पिंपळ पूजेचा विधी
1
. सूर्योदयापूर्वी स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर भगवान श्रीविष्णूची पूजा करावी.
2. पिंपळाचे झाड असलेल्या मंदिरात जावे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
3. पिंपळाच्या मुळावर गाईचे दूध, तीळ आणि चंदन मिसळून पवित्र जल अर्पण करा.
4. जल अर्पण केल्यानंतर जानवे, फुले, प्रसाद आणि इतर पूजा साहित्य अर्पण करावे.
5. धूप-दीप लावून आरती करावी.

स्कंद पुराण : पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा निवास
स्कंद पुराणानुसार, श्रीविष्णू पिंपळाच्या मुळामध्ये,श्रीकृष्णाचा देठात आणि फळांमध्ये सर्व देवता वास करतात. पिंपळ हे भगवान विष्णूचे जिवंत रूप मानले जाते. दुसरीकडे, श्रीमद भागवत गीता भगवान कृष्ण म्हणतात की सर्व वृक्षांमध्ये सर्वोत्तम पिंपळ वृक्ष आहे कारण ते माझे वास्तविक रूप आहे.

पिंपळाची पूजा केल्याने वाढते सुख-समृद्धी
पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने विविध दोष नष्ट होतात. यामुळे अडचणी समाप्त होण्यास मदत होते. या झाडामध्ये देव आणि पितर दोघांचाही वास असल्याने यांची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते. यामुळे महिलांचे सौभाग्य वाढते. धन लाभाचेही योग जुळून येतात.

बातम्या आणखी आहेत...