आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:19 वर्षांनंतर लक्ष्मी व विष्णूच्या पूजेचा योग; 18 सप्टेंबरपासून सुरू हाेत आहे वैभव प्रदान करणारा आश्विन अधिक मास

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धर्मग्रंथ सांगतात - अधिक महिन्यात जप, तप, व्रत, दान अक्षय फळ-पुण्य देतात
  • याआधी 2001 मध्ये आला होता असा दुर्मिळ योग

१८ सप्टेंबरपासून अधिक महिना सुरू होत आहे. तीन वर्षांत एकदा येतो. मात्र, १९ वर्षांनंतर आश्विन अधिक मास आहे. म्हणजे यंदा दोन आश्विन महिने असतील. याआधी २००१ मध्ये असा योग आला होता. या अधिक महिन्यामुळे अनेक दुर्मिळ योग येत आहेत, जे वैभवात वाढ करणारे आहेत. अधिक मास भगवान विष्णू व कृष्णाच्या आराधनेचा असतो. मात्र, आश्विन मास असल्याने लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा महिना आहे. म्हणजे हा महिना लक्ष्मी व विष्णू दोघांच्या आराधनेचा आहे. आश्विन महिन्यातील पौर्णिमा लक्ष्मीच्या पृथ्वीवरील आगमनाची मानली गेली आहे. तिला शरद पौर्णिमा म्हणतो. आश्विन महिन्याला लक्ष्मीच्या आराधनेचा म्हटले गेले आहे. धर्मग्रंथ सांगतात की, अधिक महिन्यात केलेले जप, तप, व्रत व दान अक्षय फळ देतात. त्यांचे पुण्य कधीच संपत नाही. या महिन्यात विष्णूसोबत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपायही अक्षय फळ देतात.

अधिक महिन्यातील पहिला दिवस समृद्धी देणारा, शुभ योगही

अधिक मास शुक्रवारपासून सुरू होत आहे. या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असेल. काशीचे पंडित एस. एल. त्रिवेदी यांच्यानुसार उत्तरा फाल्गुनी नक्षत्र तीव्र फळ देणारे असते. या नक्षत्रात महिन्याचा प्रारंभ शुभ व शीघ्र फळ देणारा असेल. उत्तरा फाल्गुनी सन्मान व समृद्धीतही वेगाने वाढ करतो. अधिक महिन्यात वैभवाशी संबंधित कामे वेगाने परिणाम देणारे असतील. शुक्ल नावाचा शुभ योगही असेल. हा योग नावाप्रमाणेच प्रकाश आणि शीतलता प्रदान करतो. या महिन्यात सोने-चांदी तसेच यंत्र व वाहन खरेदीसाठी अनेक मुहूर्त आणि शुभ योग आहेत.

पूर्ण महिन्यात अनेक शुभ याेग असतील

अधिक महिन्यात दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबरला द्विपुष्कर योग आहे. २० ला स्वाती नक्षत्र, २१ ला विशाखा नक्षत्र असेल. २६ ला सर्वार्थसिद्धी योग व २७ सप्टेंबरला कमला एकादशी आहे. त्याला लक्ष्मीचा दिवस म्हणतात. एकादशी भगवान विष्णूलाही प्रिय आहे.

अधिक मास का देतो वैभव-समृद्धी

अधिक महिन्याला ग्रंथांनी व्याजाचा काळ म्हटले आहे. हा वर्षातील १२ महिन्यांशिवायचा अतिरिक्त काळ. पुरुषोत्तम महिनाही म्हणतात. भगवान विष्णूला सृष्टीचा संचालक म्हटले गेले आहे. ते गृहस्थ जीवनाचे देवता आहेत. ते गृहस्थांनाच सर्व वैभव देतात.