आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ संयोग:नवरात्रीत अंगारक चतुर्थीचा योग; या दिवशी गणेश पूजनाने दूर होतील आजार, तसेच मंगळ दोषही नष्ट  होईल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक मान्यतांमध्ये विनायक चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी जो कोणी श्रीगणेशाहची व्रत-विधीनुसार पूजा करतो, श्रीगणेश त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. यावेळी विनायक चतुर्थी मंगळवार, 5 एप्रिल रोजी आहे. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

श्रीगणेशासोबत मंगळ देवाची पूजा
या अंगारक चतुर्थी व्रतामध्ये श्रीगणेश आणि चंद्रासोबत मंगळ देवाची पूजा केली जाते. शास्त्रानुसार मंगळ ग्रहाची पूजा शिवलिंगाच्या रूपात केली जाते. अंगारक चतुर्थीच्या व्रतामध्ये मंगळ पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. या दिवशी शिवलिंगाला लाल चंदन, लाल फुले आणि गुलाल अर्पण करावा. या चतुर्थीच्या व्रतामध्ये लाल वस्त्र परिधान करावे. यासोबतच शिवलिंगावर फळांच्या रसाने अभिषेक करावा.

मंगळवारी लाल फुलांनी पूजा करावी
श्रीगणेशाला हिरवा तसेच लाल रंगही प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे गणेशपूजनात लाल फुलांचा वापर करावा. श्रीगणेशाची पूजा करताना जास्वदांच्या फुलाचा वापर करू शकता. असे मानले जाते की जास्वदांच्या फुलाने श्रीगणेश लवकरच प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. तसेच मंगळवारी झेंडूचे फूल अर्पण करावे.

संकष्टी चतुर्थी पूजा विधी

  • या दिवशी पहाटे लवकर स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघर स्वच्छ करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा.
  • यानंतर भगवान श्रीगणेशाला गंगाजल अर्पण करून अभिषेक करावं. फुले अर्पण करावीत
  • श्रीगणेशाला गुलाल अर्पण करून मंत्रोच्चारात नैवेद्य दाखवा. या दिवशी श्रीगणेशाला लाडू किंवा मोदक यांसारख्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
  • दुर्वा अर्पण कराव्यात. श्रीगणेशाची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा.
बातम्या आणखी आहेत...