आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

योगिनी एकादशी:हे व्रत केल्याने मिळते 88 हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याएवढे पुण्य

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • योगिनी एकादशी : वाचा, व्रताचे महत्त्व; पूजन विधी व कथा

ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या वर्षी ही एकादशी 17 जून, बुधवारी  आहे. धर्म शास्त्रानुसार हे व्रत केल्याने भगवान शंकरासह भगवान विष्णूही प्रसन्न होतात. या एका व्रताचे पुण्य 88 हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याच्या पुण्याएवढे असते. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कम्रेंद्रियांसह मनावर नियंत्रण ठेवण्यास हे व्रत सहायक ठरते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सर्व रोग नष्ट होतात.

व्रत विधी -

योगिनी एकदाची व्रत नियमाचे पालन दशमी तिथी (16 जून, मंगळवार)ला रात्रीपासून सुरु करावे. ब्रह्मचर्यचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी उपवास करावा. या व्रताच्या उपवासात खडीसाखर, द्रवपदार्थ, दूध आणि दुधापासून केलेली पक्वान्ने ग्रहण करतात. हे व्रत वर्षा ऋतूच्या आरंभी केले जाते. नवा भाजीपाला येण्याचा हाच काळ असतो. आरोग्यास अपायकारक अनेक जिवाणू उत्पन्न झालेले असतात. त्यामुळे एक दिवस निराहार राहून दीर्घकाळ निरोगी राहण्याचे सूत्र सांगणारे हे व्रत आहे.

एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णुंची विधिव्रत पूजा करावी. (तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर एखाद्या ब्राह्मणाकडून पूजा करून घेऊ शकता) पवित्र होऊन भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर बसून संकल्प घ्या. संकल्प घेताना खालील मंत्राचा उच्चार करा...

मम सकल पापक्षयपूर्वक कुष्ठादिरोग निवृत्तिकामनया योगिन्येकादशीव्रतमहं करिष्ये।

त्यानंतर भगवान विष्णूला पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर देवाचे चरणामृत(तीर्थ) व्रती (व्रत करणारा) आणि कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर शिंपडावे आणि तीर्थ प्राशन करावे. असे मानले जाते की, यामुळे विशेषतः कुष्ठ रोगाची पिडा नष्ट होते आणि तो रोगमुक्त होतो.

त्यानंतर देवाला गंध, पुष्प, धूप-दीप, नैवेद्य इ. पूजन सामग्री अर्पण करावी. विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. या दिवशी तन आणि मनाने हिंसेचा त्याग करावा तसेच कोणाचीही निंदा करू नये. रात्री जागरण करावे.

योगिनी एकादशी व्रत कथा 

स्वर्गातील अलकापुरीचे राजाधिराज कुबेर नेहमी महादेवाच्या भक्तीत तत्पर होते. त्यांचा हेममाली नावाचा एक यक्ष सेवक होता. तो त्यांच्या पूजेसाठी दररोज फुले घेऊन येत असे. हेममालीला विशालाक्षी नावाची एक सुंदर पत्नी होती. तो यक्ष सदैव पत्नीत कामासक्त राहत असे. एके दिवशी हेममाली मानसरोवरातून फुले आणून घरीच पत्नीसोबत हास्यविनोदात रममाण झाला. त्यामुळे त्याला कुबेराच्या राजभवनात फुले घेऊन जाण्यास उशीर झाला. जेव्हा पुजेची वेळ निघून गेली तेव्हा यक्षराजाने क्रोधीत होऊन सेवकांना विचारले, दुरात्मा हेममाली का आला नाही. सेवकांनी सांगितले की, राजन! तो तर पत्नीच्या कामनेत आसक्त होऊन घरातच बसला आहे. 

हे ऐकून कुबेर अधिकच क्रोधीत झाले आणि त्यांनी हेममालीला शाप दिला की, तू देवाचा अपमान केला आहेस म्हणून तू कोडी होशील आणि तुझ्या प्रिय पत्नीपासून दुरावाशील. कुबेराच्या शापामुळे तो स्वस्थानापासून पतित झाला. कोडामुळे त्याच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. परंतु शिवपूजेच्या प्रभावाने त्याची स्मरणशक्ती पूर्ववत राहिली. त्यानंतर त्याला मार्कंडेय ऋषींचे दर्शन घडले. पापी यक्षाने ऋषींना नमस्कार केला. त्याला भीतीमुळे थरथर कपात असलेला पाहून मार्कंडेय ऋषी म्हणाले : तुला हे कोड कसे झाले? हेममालीने सर्व घटना मार्कंडेय ऋषींना सांगितली. त्याची व्यथा ऐकून मार्कंडेय ऋषी म्हणाले की, तू येथे खरे बोललास म्हणून मी तुला कल्याणदायी व्रताचा उपदेश देतो. तू ज्येष्ठ पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या पुण्याईने तुझे कोड निश्चितच दूर होईल. हेममालीने योगिनी एकादशीचे व्रत केले. त्यामुळे त्याचे कोड दूर झाले. या उत्तम व्रताचे अनुष्ठान केल्याने तो सुखी झाला.

0