आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्री विशेष:शक्तीची साधना यशस्वी करण्यासाठी 9 दिवस करू शकता दुर्गा सप्तशतीच्या या मंत्राचा जप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावेळी देवी दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येत आहे. यावेळी नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस असल्याने हा संपूर्ण योगायोग अतिशय शुभ ठरणार आहे. कारण जेव्हाही नवरात्र 9 दिवस साजरी केली जाते तेव्हा हे दिवस शक्तीच्या उपासनेसाठी खूप शुभ असतात. देशात सुख-समृद्धीचे संकेतआहेत. पण मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी देवी मंत्राचा जप करण्याची परंपरा ग्रंथांमध्ये सांगितली आहे. चला जाणून घ्या, त्या खास मंत्राविषयी ज्यामुळे नवरात्रीची साधना यशस्वी होईल.

देवीच्या प्रसन्नतेसाठी या मंत्राचा जप करा
असे मानले जाते की, नवरात्रीमध्ये देवीचे नाव घेतल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. विधीपूर्वक मातेचे पूजन व उपासना केल्यास साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. नवरात्रीमध्ये काही विशेष मंत्रांचा जप केल्याने इच्छित कार्य सिद्ध होते आणि पूजेचे फळ अनेक पटीने मिळते.

सप्तशतीच्या मंत्रांचा नऊ दिवस किंवा नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवशी जप केल्याने माता प्रसन्न होते आणि भक्ताचे रोग, व्याधी, दुःख, दारिद्र्य यांचा नाश करून भक्ताला उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

दुर्गा सप्तशतीमध्ये या मंत्राचा उल्लेख आहे, म्हणून 9 दिवस विधिव्रत या मंत्राचा जप 9,108 वेळेस किंवा जास्त करू शकता.

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो: स्वस्थै:स्मृता मतिमतीव शुभां ददासि।
दरिद्रायदु:खभयहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदाSर्द्रचित्ता।।

मंत्राचा अर्थ
देवी दुर्गा, तुझे स्मरण केल्यानंतर तू सर्व प्राणिमात्रांचे भय दूर करून त्यांना निरोगी आयुष्य देते. निरोगी लोकांनी चिंतन केल्यानंतर त्यांना सर्वोच्च कल्याणमयी बुद्धी देते. दु:ख, दारिद्र्य आणि भय दूर करणारी हे देवी, तुझ्याशिवाय आमचे दुसरे कोण आहे, जिचे मन आणि चित्त सर्वांचे कल्याण करण्यासाठी सदैव दयेने परिपूर्ण आहे. म्हणून, जो या मंत्राचा जप करतो त्याला सर्व व्याधी, म्हातारपण, वेदना, दुःख, दारिद्र्य यापासून मुक्ती मिळते. या मंत्राचा सम्पुट लावून नवचंडीचा पाठ नवरात्रीमध्ये केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि देवीची असीम कृपा प्राप्त होते.

महाअष्टमी व्रत : 9 एप्रिल रोजी अष्टमी आहे. दुर्गा देवीचे प्रस्थान सोमवार, 11 एप्रिल रोजी दशमी तिथीला महिष वाहनाने होईल. देवीची उपासना केल्याने शांती आणि सर्व रोगांपासून मुक्ती मिळते, म्हणून शक्तीचा महान उत्सव पूर्ण भक्तिभावाने साजरा करा.

बातम्या आणखी आहेत...