आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे महिन्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात

मंगळवार 1 डिसेंबरला रोहिणी नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. मंगळवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : राखाडी| अंक : १
कार्यक्षेत्रात आज काही फायदेशीर घडामोडी घडतील. आर्थिक संकटे पळ काढतील. प्रवासात खोळंबा होईल.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता| अंक : ७
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. बेरोजगारांना नोकरीचे काॅल्स येतील. वैवाहिक जीवनांत जोडीदाराची साथ राहील.

मिथुन : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
देणी चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. डोळ्यांची निगा राखा.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ७
कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून मित्रपरिवारात तुमच्या शब्दास मान राहील.

सिंह :शुभ रंग : निळा| अंक : ८
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे.

कन्या : शुभ रंग : क्रीम| अंक : ९
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकला. शासकीय कामे रखडतील. गृहिणींचा देवधर्माकडे ओढा राहील.

तूळ : शुभ रंग : मोतिया|अंक : ६
शारीरिक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन चालवताना जपून.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी|अंक : ३
रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

धनु : शुभ रंग : सोनेरी| अंक : ४
आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

मकर : शुभ रंग : भगवा| अंक : १
घरात अाधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

कुंभ : शुभ रंग :केशरी|अंक : ५
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या कही घटना घडतील. मुलांच्या अभ्यासात लक्ष घाला.

मीन : शुभ रंग : डाळिंबी|अंक : २
रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. आज टेलिफोन व लाइट बिले भरावी लागतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser