आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. गुरुवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : राखाडी| अंक : ७
नोकरदार मंडळी वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल.

वृषभ: शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८
उंची राहणीमानाकडे तुमचा कल असेल. विलासी वृत्ती बळावेल. कलाक्रिडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वाकांक्षा वाढतील. प्रेमवीरांसाठी ग्रीन सिग्नल.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
कौटुंबिक जिवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आईचे मन दुखाऊ नका.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. भावंडांमधे सामंजस्य राहील.

सिंह :शुभ रंग : हिरवा| अंक : ३
मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ६
आपल्या कुवतीबाहेर जबाबदाऱ्या स्विकारू नका. महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.

तूळ : शुभ रंग : नारिंगी|अंक : २
व्यावसायिक अडचणींवर मात कराल. इतरांनी दिलेल्या अश्वासनांवर अवलंबून राहू नका. दिवस खर्चाचा.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी|अंक : ५
कौटुंबिक सदस्यांत सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी थोडेसे मतभेद होऊ शकतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : १
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ३
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.

मीन : शुभ रंग : आकाशी|अंक : ७
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. मित्रांनी केलेली खोटी स्तुती आवडेल.

बातम्या आणखी आहेत...