आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवार 19 नोव्हेंबर रोजी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. गुरुवारच्या या अशुभ योगामुळे 5 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...
मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ९
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. गृहिणी दानधर्म करतील.
वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : १
कष्टाच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी कामातील उत्साह दांडगा राहील. काही कामे नि:स्वार्थीपणे कराल. आजच्या कष्टाचे फळ उद्या नक्की.
मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम तोडल्यास दंड चुकणार नाही.
कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. कुसंगतीने प्रतिष्ठेस धोका होईल.
सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ९
आज पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे.
कन्या : शुभ रंग : केशरी| अंक : ६
आज काम कमी व धावपळच जास्त होणार आहे. कार्यक्षेत्रात विरोधकांना कमजोर समजू नका.
तूळ : शुभ रंग : मोतिया|अंक : ७
अनपेक्षित पैसा येईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल. विरोधकांचा विरोध गोड बोलूनच थोपवून धरता येईल.
वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४
योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. मित्रांमध्ये मोठेपणा मिळेल.
धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ५
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबीयांना अभिमान वाटण्याजोगी अशी कामगिरी कराल.
मकर : शुभ रंग : नारिंगी| अंक : १
कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना ग्रीन सिग्नल आहे.
कुंभ : शुभ रंग : पिस्ता|अंक : ३
जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संततीकडून सुवार्ता येतील.
मीन : शुभ रंग : क्रीम|अंक : २
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल. विरोधक माघार घेतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.