आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. शनिवारी चित्रा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : राखाडी| अंक : ३
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. वैचारीक देवाणघेवाण होईल. वैवाहीक जिवनांत सुसंवाद राहील.

वृषभ: शुभ रंग : नारिंगी | अंक : ५
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील.काही कामे आज नि:स्वार्थीपणे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ७
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.आज कामावर दांडी मारून थोडं मनोरंजनास प्राधन्य द्याल. वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : १
एखाद्या सामाजिक कार्यात कार्यरत रहाल. आज दुपारनंतर एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल.

सिंह :शुभ रंग : निळा|अंक : २
आज तुमचा बराच वेळ घराबाहेरच जाणार आहे. वाहतूकीचे नियम तोडल्यास दंड चुकणार नाही.

कन्या : शुभ रंग : आकाशी|अंक : ४
राशीच्या धनस्थानात प्रवेश करणारा चंद्र अनपेक्षित पैसा मिळवून देईल. आज भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : पिवळा|अंक : ३
मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. विरोधकांच्या कारवाया चालूच राहतील.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी|अंक : ५
पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग मोठे असतील. आज चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे.

धनु : शुभ रंग : केशरी|अंक : ६
योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. मित्रमंडळींत मोठेपणा मिळेल. विरोधकांचा विरोध आज मावळेल.

मकर : शुभ रंग : तांबडा|अंक : ७
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये नकोत.

कुंभ : शुभ रंग : क्रिम | अंक : ९
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल.महत्वाचे निर्णय घेताना थोर मंडळींचा सल्ला घ्यावा.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८
भागिदारी व्यवसायात तीव्र स्वरूपाचे मतभेद होवू शकतात. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता असणे गरजेचे. वाहन जपून चालवा.