आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार, 9 डिसेंबर रोजी उत्तर फाल्गुनी नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे बुधवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
मेष: शुभ रंग : राखाडी| अंक : ४
आरोग्याविषयी समस्या भेडसावतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे. दुकानदारांची उधारी वसूल होईल.
वृषभ: शुभ रंग : पिस्ता| अंक : १
पारिवारिक सुखात वृद्धीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. तरुण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावा.
मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना गृहोद्योगांतून चांगली मिळकत होईल.तरुणांनी कुसंगत टाळावी. प्रेमप्रकरणे वैताग देतील.
कर्क : शुभ रंग : तांबडा| अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील. विद्यार्थ्यांनी श्रम वाढवायला हवेत. यश सोपे नाही.
सिंह :शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
कन्या : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
स्वत:चेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. आज घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घ्याल. संयम ठेवा.
तूळ : शुभ रंग : लेमन|अंक : ७
दूरचे नातलग संपर्कात येतील. आपल्या बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.
वृश्चिक : शुभ रंग : पांढरा|अंक : १
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.
धनु : शुभ रंग : चंदेरी| अंक : २
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल.
मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची हमखास साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.
कुंभ : शुभ रंग : जांभळा|अंक : ३
आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडून सहकार्याची अपेक्षा नको.
मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ५
आज धंद्यातील आवक-जावक सेम सेमच राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.