दुर्लभ संयोग / 972 वर्षांनंतर शनि जयंतीला 4 ग्रह एकत्र, शनि-गुरु राहणार एकाच राशीत, 1048 मध्ये जुळून आला होता असा योग

  • पुढील 500 वर्षात जुळून येणार नाही असा संयोग

दिव्य मराठी

May 17,2020 11:48:00 AM IST

शुक्रवार 22 मे रोजी ज्येष्ठ मासातील अमावास्या तिथी असून याच दिवशी शनि जयंती साजरी केली जाईल. काशीचे ज्योतिषाचार्य पं.गणेश मिश्रा यांच्यानुसार, शनि जयंतीच्या दिवशी ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे 972 वर्षांनंतर दुर्लभ योग जुळून येत आहे. यावेळी शनि जयंतीला चार ग्रह एकाच राशीमध्ये राहतील आणि शनिसोबत बृहस्पती (गुरु) मकर राशीमध्ये राहील. ग्रहांची अशी स्थिती 21 मे 1048 मध्ये जुळून आली होती. आता असा संयोग पुढील 500 वर्षात जुळून येणार नाही.

दुर्लभ ग्रहस्थितीचा देशावर प्रभाव

ज्योतिषाचार्य पं. मिश्रा यांच्यानुसार, शनि जयंती म्हणजे ज्येष्ठ मासातील अमावस्येला शनि स्वतःची राशी मकरमध्ये बृहस्पतीसोबत राहील. या ग्रहस्थितीमुळे देशामध्ये न्याय आणि धर्म वाढेल. नैसर्गिक संकट आणि महामारीला पराभूत करून भारत एक बलशाली स्वरूपात दिसेल. देशामध्ये धार्मिक कार्य वाढतील. मजूर कामगारांसाठी चांगला काळ सुरु होईल. शेतीला चांगले दिवस येतील. धान्य आणि खाद्यपदार्थासहीत इतर वस्तूंचे उप्तादनही वाढेल.

शनि जयंतीला वृषभ राशीमध्ये सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र एकत्र राहतील. या 4 ग्रहांमुळे देशाची अर्थव्यवस्था वाढेल. देशाच्या कायदा आणि व्यावसायिक नितीमध्ये बदल होईल. जगभरात भारताची प्रसिद्धी होईल. जगातील इतर देश भारताची मदत करतील.

तेल अर्पण करावे, तीळ आणि उडदाचे दान करावे

शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला तेल अर्पण करावे. यासोबतच काळा कपडाही अर्पण करावा. शमीची पाने आणि अपराजिताचे निळे फुल शनि पूजेत अवश्य असावे. तीळ, उडीद, लोखंड, कोळसा, काळे वस्त्र यावर शनीचा प्रभाव राहतो. यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या वस्तूंचे दान करावे.

X