आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (02 April 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 2 एप्रिल रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शूल नावाचा अशुभ योग तयार करतआहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : १
शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काहीजणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा. आईच्या आज्ञेत रहा.

वृषभ | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ४
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. महत्वाच्या कामासाठी थोडी वणवण होईल.

मिथुन | शुभ रंग:पिवळा, शुभ अंक : ३
आज अती उत्साहाने तुम्ही काही चूकीचे निर्णय घ्याल. विवाहेच्छूकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

कर्क | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ५
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको.संध्याकाळी एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. उंची वस्त्रखरेदी कराल. आज संध्याकाळी हरवलेले गवसेल.

सिंह | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : २
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस, कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ.

कन्या | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ८
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबियांना वेळ देणे अवघड होईल.

तूळ | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ६
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. वडीलधाऱ्यांचा मान राखा.

वृश्चिक | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ९
आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. हितशत्रू कदाचित मित्रांमधेच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध रहा.

धनु | शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ७
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपले महत्व सिध्द करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

मकर | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ४
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

कुंभ | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ८
कलाकार मंडळी प्रसिध्दीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेखच दिवसानी मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

मीन | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : १
आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.