आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (03 April 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 3 एप्रिल रोजी मघा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ९
दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहीक जिवनातील काही गोड आठवणी मनास आनंद देतील.

वृषभ : शुभ रंग:लाल, शुभ अंक : ७
कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागेल. प्रेमी युगुलांनी आज न भेटलेलेच बरे. गृहीणी आज घराची शोभा वाढवण्यासाठी पैसा खर्च करतील. व्यस्त दिवस. आजचा दिवस धावपळीचा आहे.

मिथुन : शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ६
वास्तू व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेत तर बरे होईल. विद्यार्थी आज आभ्यासापेक्षा खेळातच रमतील. वाहन रस्त्यात नादुरूस्त होण्याची शक्यता आहे.

कर्क : शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ८
एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांचीही मने जिंकाल. आज दूरावलेले मित्र जवळ येतील. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

सिंह : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. कठोर बोलल्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. कुणाला मोफत सल्लेवाटप करू नका.

कन्या : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : २
घरात थोरांच्या शब्दास मान द्यवा लागेल. आज एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडेल. काहीजणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

तूळ :शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ४
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदीही होईल. आज लांबच्या प्रवासात बेसावध राहू नका.

वृश्चिक : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : १
आळस झटकून कामाला लागाल, पण अती उत्साहात आज काही चूकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

धनु : शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ३
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्वांना मुरड घालावी लागेल. महत्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

मकर : शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ५
कामाच्या ठीकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेत. आज दुपारनंतरचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील.

कुंभ : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : १
केवळ भिडस्तपणापायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारु नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल.

मीन : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
वैवाहीक जिवनातील मतभेद संध्याकाळी निवळतील. काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. फार काळजी करु नका पण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अवश्यक.