आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवार 3 मार्च रोजी पुनर्वसू नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर शुक्रवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस....
मेष | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ८
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूंना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.
वृषभ | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ६
आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. क्षुल्लक कारणावरून शेजारी रुसून बसतील. आज जरा स्पष्टवक्तेपणास आवर घालायला हवा. नाती दुरावतील.
मिथुन | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ५
आज काहीसे लहरीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तयारी नसेल. उतावीळपणाने घेतलेले काही निर्णय चुकतील. हातचे सोडून पळत्यामागे धावाल.
कर्क | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ९
एखादी हरवलेली वस्तू गवसेल. आज तुम्ही स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्रखरेदी होईल.घरात थोरामोठ्यांच्या हो ला हो करा, वाद वाढवू नका.
सिंह | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजळामागे धावणार आहात.
कन्या | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ४
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.
तूळ | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : २
काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. वैवाहिक जीवनात आज काही सौम्य मतभेद होतील.
वृश्चिक | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ३
आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. आज नास्तिकही देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत योजाल. दैवाची साथ राहील.
धनु | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : १
व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ असेल. कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.
मकर | शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : १
धंद्यात येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणी आंगावर काढू नका. आज विश्रांतीही आवश्यक.
कुंभ | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ५
कला क्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो अाहे.
मीन | शुभ रंग:निळा, शुभ अंक : २
कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची ऊठबस आनंदाने करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.