आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 4 एप्रिल 2023 रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ६
हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल.नवोदीत कलाकारांना उत्तम संधी चालून येतील. आज तुम्ही स्वत:च्या व्यक्तिमत्व विकसाला प्राधान्य द्याल.
वृषभ : शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ८
सौदर्यप्रसाधनांशी निगडीत व्यवसाय चांगले चालतील. गृहीणींना मुलांच्या अभ्यासात लक्ष द्यावेच लागणार आहे. काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल.
मिथुन : शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ९
महत्वाचे घरगुती निर्णय दिवसाच्या उत्तरार्धात घ्या.मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. सासुबाईंनी दिलेल्या शाब्बासकिने गृहीणी सुखावतील.
कर्क : शुभ रंग:लाल, शुभ अंक : ७
खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही. आज काही हवेहवेसे वाटणारे पाहूणे घरी पायधूळ झाडतील. आज महत्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधाल.ऐकून घेण्याची तयारी ठेवा.
सिंह : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : २
आज स्वत:चेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. अती आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकतील. कार्यालयिन महत्वाचे पेपर्स गहाळ हाेण्याची शक्यता.
कन्या : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
संध्याकाळी एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. उंची वस्त्रखरेदी कराल. आज गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. आज दिवस खर्चाचा आहे बचतीचा विचारच सोडून द्या.
तूळ : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : १
जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस, जे चिंताल तसे होईल. आज कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ४
कामाच्या व्यापात आज महत्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदचित कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.
धनु : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ५
सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांना खूष ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
मकर : शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ३
कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध रहा. आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. हितशत्रू कदाचित मित्रांमधेच लपलेले असू शकतील.
कुंभ : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.
मीन : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : १
आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.