आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवार 4 मार्च रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : १
मंदावलेल्या उद्योगास पूर्ववत गती येईल. महत्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम रहाल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. घरसजावटीस प्राधान्य द्याल.
वृषभ | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ४
नविन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वासही आज नुकसानास कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा.
मिथुन | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ३
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज अनावश्यक खर्च टाळा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवेल. वृध्दांनी तळपायांची काळजी घ्यावी.
कर्क | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम पाळावेत.
सिंह | शुभ रंग: मरून, शुभ अंक : २
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.
कन्या | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
नोकरीच्या ठीकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टीकोन बाळगा. मोठा भाऊ आज योग्य सल्ले दईल.
तूळ | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ६
आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली शासकीय कामे गती घेतील.
वृश्चिक | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ९
कार्यक्षेत्रात डोक्यास ताप देणाऱ्या काही घटना घडतील. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठ जितके विचारतील तितकेच सांगा. फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील
धनु | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ७
कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. वैवाहिक जिवनांत फार अपेक्षा नकोत. सामान्य दिवस.
मकर | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ७
सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच करा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. भागिदारीत देण्याघेण्याचे व्यवहार चोख असलेले बरे.
कुंभ | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ९
नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांच्या मर्जीत रहाल. तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी आंगावर काढू नका. वैवाहिक जिवनांत तिसऱ्या व्यक्तीचा विषयच नको.
मीन | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ३
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. असाध्य आजारावर डॉक्टरांना अचूक उपाय सापडेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.