आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (05 April 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 5 एप्रिल रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग:मातिया, शुभ अंक : ८
नोकरदारांवर वरीष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी आंगावर काढू नका. पतीपत्नीं मधील मतभेद दुपारनंतर निवळतील.

वृषभ : शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ६
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाचीही उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सोडवावे लागतील. आज हितशत्रू तुमच्या चुका शोधत आहेत सतर्क रहा.

मिथुन : शुभ रंग:लाल, शुभ अंक : ७
व्यापर उद्योगास चांगली गती येईल. महत्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

कर्क : शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ९
नविन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वासही आज नुकसानास कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवा.ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

सिंह : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
नविन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वासही आज नुकसानास कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा.

कन्या : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : २
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्व वाढेल. इतरांस न झेपणाऱ्या स्विकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

तूळ : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ४
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्यास अश्वासने देऊ नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

वृश्चिक : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : १
नोकरीच्या ठीकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम पाळावेत.

धनु : शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टीकोन बाळगा. वडील आज योग्य सल्ले देतील.

मकर : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ५
नाेकरी धंद्यात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल, पण तसे करू नका. प्रलोभने टाळा, संयम ठेवा.

कुंभ : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : १
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.आज ज्येष्ठ मंडळींना सत्संगातून मन:शांती मिळेल.

मीन : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागिदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.