आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (05 March 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 5 मार्च 2023 रोजी अतिगंड नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 मधील 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे योग्य ठरेल. या राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. व्यर्थ धावपळ आणि तणावाची स्थिती राहील. खर्च वाढेल तसेच हे लोक चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत येऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ३
मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहीणींना आज माहेरची ओढ लागेल. स्थावर शेती वाडी संबंधीत काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील.

वृषभ | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ५
आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.

मिथुन |शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : १
आज तुमचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल.गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहीणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.

कर्क | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ४
कार्यक्षेत्रात हितसंबंध निर्माण होतील. उपवरांना स्थळे सांगून येतील. इतरांच्या भानगडीत मध्यस्ती कराल. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल.

सिंह | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

कन्या | शुभ रंग:मरून, शुभ अंक : २
पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

तूळ | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ९
नोकरदारांना वरीष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची तुमची आज तयारी असेल.

वृश्चिक | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ६
उद्योग धंद्याच्या दृष्टीने थोडासा विराेधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार अाहे.

धनु | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ३
फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. आज भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी दिवस योग्य नाही. गाडी हळूच चालवा.

मकर | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ९
आज वैवाहीक जिवनांत गोडीगुलाबी असणार आहे. महत्वाच्या घरगुती प्रश्नांत जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौसमौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.

कुंभ | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ७
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

मीन | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ७
आज हौस मौज करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

बातम्या आणखी आहेत...