आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 8 एप्रिल रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ६
सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागिदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

वृषभ : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
नोकरदारांवर वरीष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी आंगावर काढू नका. पतीपत्नीं मधील काही मतभेद संध्याकाळी निवळतील.

मिथुन : शुभ रंग: लाल, शुभ अंक : ७
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वत:चे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

कर्क : शुभ रंग: चंदेरी, शुभ अंक : ९
व्यापर उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराची खरेदी विक्री लाभ देईल. आज मातोश्रींचे सल्ले महत्वपूर्ण असतील. ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

सिंह : शुभ रंग:भगवा, शुभ अंक : १
नविन व्यवसायात कुवत ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वासही आज नुकसानास कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा.

कन्या : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ४
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील.

तूळ : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : २
आज कार्यक्षेत्रात स्वत:चे महत्व सिध्द कराल. नोकरदार वरीष्ठांचा विश्वास संपादन करतील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. येणी असतील तर वसूल होतील.

वृश्चिक : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्यास अश्वासने देऊ नका. स्वार्थावर लक्ष केंद्रीत करा, परमार्थ परवडणारा नाही.

धनु : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. आज मित्रांसाठी आपला मोठेपणा जपण्यासाठी काही खर्च कराल.

मकर : शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टीकोन बाळगा.

कुंभ : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
नाेकरी धंद्यात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा, संयम ठेवा.

मीन : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : १
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.