आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 9 एप्रिलला विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष: शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ९
कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.

वृषभ: शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ७
कौटुंबिक जिवनांत सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

मिथुन : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

कर्क : शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ६
कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरूण मंडळींच्या महत्वाकांक्षा वाढतील. आज स्वत:चे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल.ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

सिंह : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. आज वास्तू व वाहन खरेदीच्या मार्गातील अडचणी दूर होणार आहेत. आज आशादायी दिवस.

कन्या : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : २
आज ग़ृहीणी घर स्वच्छेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. आज वाणीत गोडवा ठेवा.

तूळ : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ४
आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणीत मृदुता ठेवतीत तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात त्रास होईल.

वृश्चिक : शुभ रंग:भगवा, शुभ अंक : १
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. विवाहेच्छूकांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक नमते घेतील.

धनू : शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ३
कौटुंबिक गरजा वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल पण तुम्ही निभाऊन न्याल. काहीजणांना अनपेक्षितपणे दूरचे प्रवास घडणार आहेत.

मकर : शुभ रंग:लाल, शुभ अंक : ५
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. म्हणाल ती पूर्व.

कुंभ : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : १
उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यस्त दिवस.

मीन : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
आज सज्जनांच्या सहवासात वैचारीक देवाण घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.