आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवार 9 मार्च 2023 रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती गंड नावाचा योग तयार करत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. इतर राशीच्या पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ३
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.
वृषभ | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : १
कलाकार मंडळी प्रसिध्दीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसानी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.
मिथुन |शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ५
आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.
कर्क | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ७
शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काहीजणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा. आईच्या आज्ञेत रहा.
सिंह | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ९
एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. विवाहेच्छूकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. अती उत्साहाच्या भरात तुम्ही काही चूकीचे निर्णय घ्याल.
कन्या | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. महत्वाच्या कामासाठी थोडी वणवण होईल.
तूळ | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ५
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको.संध्याकाळी एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. उंची वस्त्रखरेदी कराल. आज संध्याकाळी हरवलेले गवसेल.
वृश्चिक | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ६
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस, कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ.
धनु | शुभ रंग:निळा, शुभ अंक : २
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात काही तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित होतील. कदचित कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.
मकर | शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ४
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल
कुंभ | शुभ रंग:मरून, शुभ अंक : १
आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. हितशत्रू कदाचित मित्रांमधेच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध रहा.
मीन | शुभ रंग:तांबडा, शुभ अंक : ३
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.