आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (10 March 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 10 मार्च 2023 रोजी चित्रा नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:तांबडा, शुभ अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशिबाची साथ नक्की मिळेल.

वृषभ | शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ५
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. अापल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या.

मिथुन | शुभ रंग:लेमन, शुभ अंक : १
सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. घरात सज्जनांची ऊठबस राहील. गृहिणी स्वत:चे छंद जपतील जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृहसौख्याचा दिवस.

कर्क | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ९
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजारधर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

सिंह | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ७
धनस्थानातील चंद्रभ्रमण आवक वाढवेल. आज सभा- संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.

कन्या | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल.

तूळ | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ५
आज काहीसे लहरीपणे वागाल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील . तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

वृश्चिक | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ६
आज हार्डवर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल.

धनु | शुभ रंग:निळा, शुभ अंक : २
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्याल.

मकर | शुभ रंग:मरून, शुभ अंक : १
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील.नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

कुंभ | शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ४
जे चाललंय ते बरंच चाललंय म्हणा. कमी श्रमांत जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. आज सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो.

मीन | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ३
वैवाहिक जीवनात सामंजस्य असेल. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशीे एकमत राहील.आज उगीच इतरांच्या भानगडीत डोकावू नका.

बातम्या आणखी आहेत...