आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार, 11 एप्रिल रोजी ज्येष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती वरियान नावाचा योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस..
मेष : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ८
काेणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भगिदारांशी मतभेद संभवतात. वैवाहीक जिवनांत भांड्याला भांडे लागेल.
वृषभ: शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विराेधकही प्रभावीत होतील. वरीष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहीक जोडीदाराशी आज चांगले सूर जुळतील.
मिथुन : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ९
आज तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर अनपेक्षितपणे वसूल होतील. प्रवासात सावध रहा.
कर्क : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
व्यापर उद्योगास चांगली गती येईल. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल असेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल.
सिंह : शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : २
कौटुंबिक सदस्यांमधे असलेला सुसंवाद तुमचा घराबाहेर कामातील उत्साह वाढवेल. आज गृहीणींना माहेरची ओढ लागेल. कलाक्रिडा क्षेत्रात मेहनत वाढवावी लागेल.
कन्या : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ६
कार्यालयिन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचेे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आज जरा आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.
तूळ : शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ४
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.
वृश्चिक : शुभ रंग:लाल, शुभ अंक : ५
कार्यक्षेत्रात तुमचे महत्व वाढेल. वरीष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.
धनू : शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ३
आज घरात वडीलधाऱ्यांचे मूड सांभाळावे लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.
मकर : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : १
आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठीकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्रमैत्रीणींच्या सहवासात आज दिवस अानंदात जाईल.
कुंभ : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : १
नोकरीच्या ठीकाणी सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कामाच्या व्यापात आज कुटुंबियांना वेळ देणे अवघड होईल.
मीन : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ६
नविन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरेल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.