आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 12 एप्रिलचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. मूळ नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती परीघ नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. कामात अडथळे येऊ शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
मेष : शुभ रंग:मोरपीशी, शुभ अंक : २
उद्योग धंद्याच्या दृष्टीने थोडासा विराेधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्यामागे धाऊ नका. कायद्याची चाैकट मोडू नका.
वृषभ : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : १
फक्त आपलं कस भागतय एवढच बघा. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक करू नका. आज गाडी हळूच चालवा.
मिथुन : शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ४
महत्वाच्या घरगुती प्रश्नांत जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौसमौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल.
कर्क : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ३
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. कोर्ट प्रकरणे कोर्टाबाहेर मिटवलेली बरी.
सिंह : शुभ रंग: पांढरा, शुभ अंक : ६
तरूणांच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील. उच्चशिक्षित मंडळींना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.
कन्या : शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ५
स्थावर शेती वाडी संबंधीत काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेमप्रकरणांत फसगत होऊ शकते.
तूळ : शुभ रंग:लाल, शुभ अंक : ९
आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. काम कमी दगदगच जास्त. रिकामटेकड्या चर्चेतून काहीच निष्पंन्न होणार नाही.
वृश्चिक : शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ७
धंद्यात येणी वसूल होतील. विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्याल. कार्यक्षेत्रात आज स्वत:चे महत्व सिध्द करू शकाल. प्रवास त्रासदायक होईल.
धनु : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : ५
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अती उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. दूरचे प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. आज स्वत:चेच खरे कराल.
मकर : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ८
पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट वीजा संबंधीत कामे गती घेतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण मात्र वाढणार आहे. कठोर बोलण्याने नाती दूरावतील.
कुंभ : शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ३
आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असल्याने शुभच चिंता. तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील. आज काही दूरावलेली नाती सुध्दा जवळ येतील.
मीन : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ९
नोकरदारांना वरीष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहेत. मित्र आज दगा देतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.