आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवार 13 एप्रिल रोजी पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : १
आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील.नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रध्दाळू होणार आहेत.
वृषभ : शुभ रंग:मोरपीशी, शुभ अंक : २
जे चाललंय ते बरच चाललंय म्हणा. कमी श्रमांत जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.
मिथुन : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ३
वैवाहिक जिवनात सुसंवाद असेल. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागिदारांशीे एकमत राहील.आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत डोकवाल.
कर्क : शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ४
नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना आज नशीबाची साथ नक्की मिळेल.
सिंह : शुभ रंग: मरून, शुभ अंक : ९
आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. अापल्या कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या.
कन्या : शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ७
तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहीणी स्वत:चे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृहसौख्याचा दिवस.
तूळ : शुभ रंग: पांढरा, शुभ अंक : ६
एखाद्या महत्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहीणी शेजारधर्म पाळतील. जवळवासचे प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.
वृश्चिक : शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ५
धनस्थानातील चंद्रभ्रमण आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहीणी जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. छान दिवस.
धनु : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ८
आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जुन पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावीत करेल.
मकर : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : ५
आज काहीसे लहरीपणे वागाल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील . तरूणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.
कुंभ : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ९
आज हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल.
मीन : शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ३
आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.