आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 14 मार्च रोजी अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी राशीसाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग:लाल, शुभ अंक : २
आज आपल्या कुवती बाहेर कोणतीच रीस्क घेऊ नका. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह टाळा. आज सासुरवाडीकडून लाभ संभवतो. पत्नीच्या हो ला हो करा.
वृषभ : शुभ रंग:निळा, शुभ अंक : ५
व्यवसायात भागिदारांशी एकमत राहील. आज वैवाहिक जिवनांतही गोडीगुलाबी असेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुमचा आज प्रयत्न असेल.
मिथुन : शुभ रंग: मरून, शुभ अंक : १
नोकरदारांना कामाचे तास वाढवावे लागतील. कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. अारोग्याची काळजी घ्या.
कर्क : शुभ रंग:लेमन, शुभ अंक : ४
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज तुमचा माैज मजा करण्याचा मूड राहील. सहकुटुंब चैन कराल. प्रेमप्रकरणांना थोरांचे आशिर्वाद मिळतील.
सिंह : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ३
आज तुम्ही प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चेतच जास्त रमाल. कुठेही न जाता आज घरीच आराम करण्याचा तुमचा मूड असेल. गृहीणींचे गृहोद्योग आज तेजीत चालतील.
कन्या : शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ९
आज घराबाहेर वावरताना डोके थंड व वाणीत गोडवा असुद्या. काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. मोफत सल्लागार मंडळींच्या हो ला हो करा व वादविवाद टाळा.
तूळ : शुभ रंग:मरून, शुभ अंक : ८
कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठबस आनंदाने कराल.
वृश्चिक : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ६
व्यापार उद्योगात मिळकत मनाजोगती असेल. बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरू करता येतील. आप्तस्वकिय तुमच्या शब्दास मान देतील. गोड बोलून मने जिंकाल.
धनु : शुभ रंग: गुलाबी, शुभ अंक : ७
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडण्याची शक्यता आहे. काहीजणांना तातडीच्या प्रवासास निघावे लागेल. केवळ भिडस्तपणापायी न परवडणारा खर्च करू नका.
मकर : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : १
आज तुमच्यासाठी ईच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. जसे चिंताल तसे होईल, त्यामुळे आज फक्त शुभ चिंता.
कुंभ : शुभ रंग निळा, शुभ अंक : ४
आज तुम्ही रिकामटेकडी चर्चा टाळून फक्त कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गास वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. मित्र चुकीचे सल्ले देतील.
मीन : शुभ रंग पांढरा, शुभ अंक : ६
ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील. आज तुमचा आध्यात्माकडे कल राहील. घरात देवकार्य करण्याचे बेत आखाल. घरातील मोठ्यांचा मान राखावा लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.