आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवार 2 फेब्रुवारी रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...
मेष | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ४
आजचा तुमचा बराचसा वेळ घराबाहेरच जाईल. आज झालेल्या काही नव्या ओळखी व्यवसाय वृद्धीसाठी फायदेशीर ठरतील. आज लहान भावास मदत कराल.
वृषभ | शुभ रंग:तांबडा, शुभ अंक : ३
आज काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. वक्ते व्यासपीठ गाजवतील. घरी हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील. आज प्रवासाची दगदग टाळलेली बरी.
मिथुन | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : १
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. इतरांना न झेपणारी कामे सहजच पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.
कर्क | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ८
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्यास शब्द देऊ नका. काही फसव्या संधी येतील. प्रलोभनांपासून दूरच राहा. खर्चात कपात गरजेची.
सिंह | शुभ रंग:क्रीम, शुभ अंक : ७
नोकरीच्या ठिकाणी काही उत्साहपूर्ण घटना घडतील. वरिष्ठ तुमची मते ऐकून घेतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. आज वाहतुकीचे नियम पाळायला हवेत.
कन्या | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ९
नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज वडिलांचे सल्ले विचारात घ्या.
तूळ | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : २
नाेकरी-धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल, पण तसे करू नका. प्रलोभने टाळा, संयम ठेवा.
वृश्चिक | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ४
आजचा दिवस उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.आज ज्येष्ठ मंडळींना सत्संगातून मन:शांती मिळेल.
धनु | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : १
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.
मकर | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ३
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नींमधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.
कुंभ | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ६
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाचीही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रश्न सहजच सुटू शकतील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. उत्साहपूर्ण दिवस.
मीन | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ५
व्यापार-उद्योगास चांगली गती येईल. शेअर्स व्यवहारात अंदाज खरे ठरतील. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. अाज मातोश्रींकडून लाभ होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.