आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवार, 3 जानेवारी रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ३
कार्यक्षेत्रात आज काही वादग्रस्त प्रश्न तुम्ही यशस्वीरीत्या सोडवाल. काही जुन्या ओळखी आज कामी येतील. शेजारी आपलेपणाने डोकावतील. आईला दुखावू नका.
वृषभ | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ५
आज कार्यक्षेत्रात तुमचे प्रभावी वक्तृत्व कामी येईल. तुमच्या कामातील उत्साहाने तुमचे विरोधकही प्रभावित होतील. विवाहविषयक चर्चा होकाराकडे झुकतील.
मिथुन | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : २
जिथे जाल तिथे आज आपलीच मर्जी चालवता येईल. नवीन व्यावसायिकांचे श्रम कारणी लागतील व यशाची चाहूल लागेल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.
कर्क | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : १
आज मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करायला हवेत. आज रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया होतील. दूरच्या प्रवासात सावध राहा. माैल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
सिंह | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ४
जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.
कन्या | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ८
उद्योग-धंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. अधिकारयोग चालून येतील. हाताखालचे लोक अदबीने वागतील. म्हणाल ती पूर्व.
तूळ | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ६
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका. दंड भरावा लागेल. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल.
वृश्चिक | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ९
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना स्टंट नकोत.
धनु | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ७
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.
मकर | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ९
काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.
कुंभ | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ५
उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लरसाठी आवर्जून वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन कराल.
मीन | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : १
धंद्यात येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वत:चे महत्त्व सिद्ध करू शकाल. आजची संध्याकाळ प्रिय मित्रमंडळींच्या सहवासात मजेत जाईल. छान दिवस.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.