आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 3 जानेवारी रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार शुभ नावाचा खास योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ९
आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळा.
वृषभ | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ३
कमी श्रमांत जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरी पडू शकेल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले महत्त्वाचे असतील.
मिथुन | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ६
आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदुवाणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
कर्क | शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ४
आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
सिंह | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७
यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. व्यग्र दिवस.
कन्या | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ८
आज घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वादविवाद संभवतात. तुम्हाला आज जरा एकांताची गरज भासेल. ज्येष्ठ मंडळींनी आज सत्संगाकडे पावले वळवावीत.
तूळ | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ४
आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. हितश़त्रू टपूनच बसलेत, सतर्क राहा.
वृश्चिक | शुभ रंग:क्रीम, शुभ अंक : ९
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडीगुलाबी असून काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.
धनु | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ३
आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची उधारी वसूल होईल. नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील.
मकर | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ५
नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.
कुंभ | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : २
जमीन खरेदी-विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.
मीन | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : १
तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या. आज दिवस धावपळीचा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.