आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवार 4 फेब्रुवारीला पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती प्रीती नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ७
व्यापर उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. आज मातोश्रींचे सल्ले महत्त्वपूर्ण असतील.
वृषभ | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ४
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसायवृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.
मिथुन | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ८
धंद्यात येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. मृदुवाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.
कर्क | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ५
तुमचा लहरी व संशयी स्वभाव काबूत ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान असावे.
सिंह | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ९
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीजवस्तू गहाळ होईल. सतर्क राहा.
कन्या | शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : १
आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध राहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.
तूळ | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ४
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. कर्तव्यास प्राधान्य द्या.
वृश्चिक | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ३
नाेकरी-धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा, संयम ठेवा.
धनु | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : २
आजचा दिवस उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.
मकर | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ६
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.
कुंभ | शुभ रंग:पिस्ता, अंक : १
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नींमधील काही मतभेद सामंजस्याने मिटतील.
मीन | शुभ रंग: निळा, शुभ अंक : ३
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वत:चे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.