आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवार 5 जानेवारी रोजी मृग नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ९
वास्तू व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहारात फसवणूक संभवते, सतर्क रहा. विद्यार्थी आभ्यासापेक्षा खेळातच रमतील. वाहन रस्त्यात नादुरूस्त होण्याची शक्यता आहे.
वृषभ | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ७
आज कार्यक्षेत्रात गोड बोलून विरोधकांचीही मने जिंकाल. दूरावलेले मित्रही जवळ येतील. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. दिवस लाभाचा.
मिथुन | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ६
आपल्या कार्यक्षेत्रात इतरांस अशक्य ते शक्य करून दाखण्याची तुमची जिध्द राहील. विरोधकांनाही तुमची मते पटवून द्याल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
कर्क | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : २
घरात थोरांशी काही वैचारीक मतभेद संभवतात. त्याच्या वयाचा मान राखावा लागेल. आज एखादा अनपेक्षित खर्च उद्भवेल जो टाळता येणार नाही. आज वाद टाळा.
सिंह | शुभ रंग:केशरी, शुभ अंक : १
कार्यक्षेत्रात प्रगतीरथ वेगाने धावेल. आज मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज कंजूषपणास थोडा लगाम घालाल.
कन्या | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ८
आज आळस झटकून कामाला लागाल, वेळेचेही याेग्य नियोजन केल्याने कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल . वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान देणे हिताचे राहील.
तूळ | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ४
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्वांना मुरड घालावी लागेल. प्रयत्नांस दैव अनुकूल राहील.
वृश्चिक | शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : ८
कामाच्या ठीकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. महत्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा.
धनु | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ५
केवळ भिडस्तपणापायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारु नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल.
मकर | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ३
काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील, त्यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अवश्यक. वैवाहीक जिवनात आज जोडीदाराच्या चूका काढण्याची चूक करू नका.
कुंभ | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : १
आज तरूण वर्गात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. कलाकार संधींचे सोने करतील. नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.
मीन | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ४
गृहीणी आज घराच्या सजावटीसाठी पैसा खर्च करतील. कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागेल. प्रेमी युगुलांनी तर आजच्या दिवस मौनव्रत ठेवणेच हिताचे राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.