आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (6 February 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 6 फेब्रुवारी रोजी आश्लेषा नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर सोमवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ३
जमीन खरेदी-विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना कठीण विषयांचीही गोडी निर्माण होईल. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृषभ | शुभ रंग: गुलाबी, शुभ अंक : ५
आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

मिथुन | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ९
आज तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात, फार अर्जंट नसतील तर टाळा.

कर्क | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : १
कमी श्रमांत जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरी पडू शकेल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले महत्त्वाचे असतील.

सिंह | शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ७
आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदुवाणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

कन्या | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ६
आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

तूळ | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ९
यशस्वी लोकांचा सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. व्यग्र दिवस.

वृश्चिक | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : २
आज घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वादविवाद संभवतात. तुम्हाला आज जरा एकांताची गरज भासेल. ज्येष्ठ मंडळींची पावले सत्संगाकडे वळतील.

धनु | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ४
आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. हितश़त्रू टपूनच बसलेत, सतर्क राहा.

मकर | शुभ रंग: स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५
व्यावसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडीगुलाबी असून काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.

कुंभ | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : १
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

मीन | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ३
नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

बातम्या आणखी आहेत...