आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (6 January 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 6 जानेवारी रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष | शुभ रंग: पिस्ता, शुभ अंक : ९
आज नोकरदारांना बढती, बदलीविषयी समाचार येऊ शकतात. मुले अभ्यासात चालढकलच करतील.गृहिणींनी सासूबाईंकडून शाबासकीची अपेक्षा करू नये.

वृषभ | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७
आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा. गृहिणींना काही प्रिय पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल.

मिथुन | शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ६
आज स्वत:चेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावधच राहा.

कर्क | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : २
आज दिवस खर्चाचा अाहे. बचतीचा विचारच सोडून द्या. घरात थोरामोठ्यांशी काही वैचारिक मतभेद होतील. आज गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. वाद मात्र टाळा.

सिंह | शुभ रंग:लाल शुभ अंक : ६
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस, जे जे चिंताल ते ते होईल. कदाचित तुमच्या पात्रतेपेक्षा अधिकच काहीतरी पदरात पडेल. अाज फक्त शुभ बोला व शुभ चिंता.

कन्या | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ४
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

तूळ | शुभ रंग:मरून शुभ अंक : ८
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच. सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

वृश्चिक | शुभ रंग:क्रीम, शुभ अंक : ८
कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वत:ला जपा. आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

धनु | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ३
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

मकर | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ५
कोणतीच गोष्ट सहजसाध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

कुंभ | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ४
हौशी मंडळी जिवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वत:चे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

मीन | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : १
आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहोद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...