आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashi Bhavishya (Horoscope Today) | Daily Rashifal (8 January 2023), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 8 जानेवारी 2023, पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजची ग्रहस्थिती वैधृती नावाचा अशुभ योग तयार करत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : १
पूर्वीच्या कामाच्या व्यापात रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालावेच लागेल. आज कुटुंबीयांना आपला जास्तीत जास्त वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

वृषभ | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ४
आजचा तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाईल. महत्त्वाच्या कार्यालयीन कामासाठी भटकंती होईल. आज गृहिणींचा शेजारी सलोखा वाढेल. वादविवाद नकोत.

मिथुन | शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ५
कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्वगुण कामी येतील. मृदू वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपली मते पटवून देऊ शकाल. आर्थिक बाजू आज भक्कम राहीलच.

कर्क | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ३
आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. जशास तसे या धोरणाने वागा. ऐकावे जनाचे करावे मनाचे या धोरणाने वागा.

सिंह | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : २
अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे हिताचे.

कन्या | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ६
जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमची काही अपूऱ्या इच्छा पूर्ण होतील. काही रखडलेले उपक्रम मार्गी लागतील. छान दिवस.

तूळ | शुभ रंग:निळा, शुभ अंक : ९
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. अधिकारयोग चालून येतील. हाताखालचे लोक अदबीने वागतील. म्हणाल ती पूर्व.

वृश्चिक | शुभ रंग:क्रीम, शुभ अंक : ६
आज अति आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका. दंड भरावा लागेल.

धनु | शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ७
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना स्टंट नकोत.

मकर | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ८
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

कुंभ | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : २
काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मीन | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ४
आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लरसाठी आवर्जून वेळ काढतील. सहकुटुंब चैन कराल.

बातम्या आणखी आहेत...