आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashifal (Horoscope Today) | Daily Rashifal (12th December 2022), Daily Zodiac Forecast In Marathi: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 12 डिसेंबर रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. तुम्ही वढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल.

वृषभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ९
महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. ज्येष्ठांनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. स्वार्थ-परमार्थ उद्यावर ढकला.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ८
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दुरावलेले नातलग जवळ येतील. मनासारखा खर्च करता येईल.व्यवसायात तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : २
आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. काही अटीतटीचे प्रश्न चतुराईने सोडवाल.

सिंह : शुभ रंग : जांभळा|अंक : १
उच्चशिक्षितांना विदेशगमनाच्या संधी चालून येतील. भक्तिमार्गात असाल तर सद्गुरू कृपेचा लाभ होईल.

कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ४
आज महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.वाहन चलवताना आपल्या सुरक्षेची काळजी घ्या.

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
व्यावसायात महत्त्वाचे करारमदार यशस्वी होतील.वैवाहिक जीवनात एकमत राहील. आनंदी दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी|अंक : ५
नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकमणे काम कराल. काही जुन्या चुकाही निस्तराव्या लागणार आहेत. व्यग्र दिवस.

धनू : शुभ रंग : क्रीम| अंक : ८
मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावे लागतील. त्यांचे लाड पुरवावे लागतील. प्रकृतिस्वास्थ्य उत्तम राहील.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : ९
स्थावर इस्टेटीविषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. मानसिक शांतता व आरोग्यही लाभेल.

कुंभ : शुभ रंग : माेरपंखी| अंक : ७
नवा मित्रपरिवार वाढेल. कामानिमित्त प्रवास होतील. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहा.

मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
अत्यंत उत्साहवर्धक दिवस. विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. जागेसंबंधित महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.

बातम्या आणखी आहेत...