आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashifal (Horoscope Today) | Daily Rashifal (17th December 2022 Saturday ), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 17 डिसेंबर 2022 रोजी उत्तर फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. एक्स्ट्रॉ इन्कम होण्याची संधी आहे. अडकलेला पैसा मिळेल. कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष: शुभ रंग : मरून | अंक : ६
महत्वाच्या चर्चा व बैठकी यशस्वी होतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्ती करू शकाल. वैवाहीक जोडीदाराशी छान सूर जुळतील. मस्त दिवस.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ४
कार्यक्षेातील वाढत्या व्यस्ततेमुळे घराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. कदाचित जोडीदाराची नाराजी पत्करावी लागेल. मोहापासून दूर रहा, प्रतिष्ठेस जपा.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : १
काही क्षुल्लक अडचणी मन:स्वास्थ्य बिघडवतील. घरात वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल.आज भावना व कर्तव्य याचा ताळमेळ साधणे कठीण जाईल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७
कोणत्याही क्षेत्रात असलात तरी काही चढाओढीचा सामना करावाच लागेल. जुन्या अनुभवींचे सल्ले उपयुक्त ठरतील. कार्यक्षेत्रात मानसन्मान वाढेल.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ९
पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरीधंद्यातील अनुकूलता वाढेल. दुरावलेले नातेसंबंध जवळ येतील. अनपेक्षित लाभ होतील.

कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
व्यवसयाची गती संथ राहील. सर्वच आर्थिक व्यवहार सावधतेने करणे गरजेचे आहे. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहेे.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५
व्यापार उद्योगात आपल्या कुवती बाहेर आर्थिक उलाढाली नकोत. पारिवारीक जिवनातील काही समस्या सोडवाव्या लागतील. व्यस्त दिवस. वाद टाळा.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६
एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरात पाहूण्यांची वर्दळ वाढेल. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल. देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वाणीत मृदुता ठेवा.

धनू : शुभ रंग : निळा | अंक : ३
काम कमी व धावपळच जास्त होईल. महत्वाची कामे रेंगाळतील. भिडस्तपणाने न झेेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराल. आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको.

मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : २
वाहन खरेदीसाठी कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. प्रॉपर्टी विषयी रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. प्रेम प्रकरणात नसती अाफत होईल.

कुंभ : शुभ रंग : लाल | अंक : ४
आज धनप्राप्तीचे विविध मार्ग खुले होतील. उच्च रहाणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण राहील. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे तुम्हाला छान जमेल.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : १
कार्यक्षेत्रात आपले महत्व सिध्द करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक जिवनांत तुमच्या शब्दाला मान राहील. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.

बातम्या आणखी आहेत...