आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवार 19 डिसेंबरची सुरुवात अशुभ योगामध्ये होत आहे. चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती अतिगंड नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग : चॉकलेटी | अंक : ७
दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.
वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. अनावश्यक खर्चावर लगाम गरजेचा राहील.
मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ६
नोकरीत वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा मेळ साधणे कठीण जाईल.
कर्क : शुभ रंग : भगवा | अंक : ८
पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत.
सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. आज जोडीदाराशी दुपारनंतर एकमत राहील.
कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
व्यावसायिक चढ-उतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.
तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. आज डॉक्टरांना भेटावे लागेल.
वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : १
नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.
धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यस्त दिवस.
मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ३.
जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. छान दिवस.
कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : २.
सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घ्यावीत.
मीन : शुभ रंग : केशरी | अंक : ४.
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. तुमचा चैनीकडे कल राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.