आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवार 2 नोव्हेंबर रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : १
घरात थोरामोठयांशी काही वैचारीक मतभेद होतील. आज गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. वाद मात्र टाळा. आज दिवस खर्चाचा अाहे. बचतीचा विचारच सोडून द्या.
वृषभ | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ५
जे जे चिंताल ते ते होईल. कदाचित तुमच्या पात्रतेपेक्षा अधिकच काहीतरी पदरात पडेल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. फक्त शुभ बोला व शुभ चिंता.
मिथुन | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ७
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदचित कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.
कर्क | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ९
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच. सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.
सिंह | शुभ रंग: नारिंगी, शुभ अंक : ४
कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वत:ला जपा. आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. विश्वासातील व्यक्तिकडूनच विश्वासघात होऊ शकतो.
कन्या | शुभ रंग: केशरी, शुभ अंक : २
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.
तूळ | शुभ रंग: निळा, शुभ अंक : ३
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ५
हौशी मंडळी जिवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वत:चे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.
धनु | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ६
आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहोद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागणार आहे.
मकर | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ७
आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आत अभ्यासात चालढकलच करतील.गृहीणींनी सासूबाईंकडून शाबासकीची अपेक्षा करू नये.
कुंभ | शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ९
आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. महत्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा. गृहीणींना काही प्रिय पाहुण्यांची उठबस करावी लागेल.
मीन | शुभ रंग:राखाडी शुभ अंक : ८
आज स्वत:चेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावधच रहा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.