आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 20 डिसेंबर रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार...
मेष : शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ४
भागिदारी तत्वावर एखादा नविन उद्योग सुरू करायचा असल्यास आजचा दिवस चांगला आहे. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदारही खंबीरपणे पाठीशी उभा राहील.
वृषभ : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : १
क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.
मिथुन : शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : २
कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरूण मंडळींच्या महत्वाकांक्षा वाढतील. आज स्वत:चे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल.
कर्क : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. आज वास्तू व वाहन खरेदीच्या मार्गातील अडचणी दूर होणार आहेत. आज आशादायी दिवस.
सिंह : शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ६
आज ग़ृहीणी घर स्वच्छेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. वाणीत मात्र गोडवा असु द्यावा.
कन्या : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ३
आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणीत मृदुता ठेवतीत तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात त्रास होईल.
तूळ : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. विवाहेच्छूकांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक नमते घेतील.
वृश्चिक : शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ७
कौटुंबिक गरजा वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल पण तुम्ही निभाऊन न्याल. काहीजणांना अनपेक्षितपणे दूरचे प्रवास घडणार आहेत.
धनु : शुभ रंग:निळा, शुभ अंक : ९
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. म्हणाल ती पूर्व.
मकर : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ५
उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यस्त दिवस.
कुंभ : शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ८
आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारीक देवाण घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.
मीन : शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : ४
कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.