आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 21 डिसेंबर रोजी विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : २
कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरूध्द घटनांनी नैराश्य येईल. वरीष्ठांशी नमते घ्या व सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. आज जोडीदाराकडून ही फार अपेक्षा नकोतच.
वृषभ : शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
आज आपल्या मर्यादेत रहा. अती आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांब रहावे, पालक हिताचेच सांगतील.
मिथुन : शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ४
कार्यक्षेत्रात काही आव्हान देणाऱ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. वैवाहिक जिवनांत काही सौम्य मतभेद राहतील. आज भागदारीतील व्यवहार लिखित स्वरूपात करावेत.
कर्क : शुभ रंग:क्रिम, शुभ अंक : १
महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धाच उरकून घ्या. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून आज तुम्ही आनंदी व्हाल.रूग्णांना असाध्य आजारावर योग्य डॉक्टर सापडतील.
सिंह : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ८
आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. मुलांचे अती लाड नकोत.
कन्या : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी अथक परिश्रमांचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबियांस अभिमान वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून घडेल.
तूळ : शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ७
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल.
वृश्चिक : शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ६
आज हट्टीपणाने वागाल. सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी नको.
धनु : शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ५
आज विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. घरात पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज संध्याकाळी सापडेल.
मकर : शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : २
आज तुम्ही आगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली अश्वासने पाळतील. महत्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकणे गरजेचे.
कुंभ : शुभ रंग:निळा, शुभ अंक : ९
उच्चशिक्षितांना अाज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लाऊ नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. छान दिवस.
मीन : शुभ रंग:मरून, शुभ अंक : १
ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कायद्याची चौकट मोडू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.