आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashifal (Horoscope Today) | Daily Rashifal (4 December 2022), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs | Marathi News

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 4 डिसेंबर 2022 रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजची ग्रहस्थिती वरियान नावाचा योग तयार करत आहे. मंगल कार्यासाठी हा योग उत्तम आहे. यात निश्चितच यश मिळेल. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 7 राशींच्या व्यक्तींना पैशांची बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांचे काम वाढणार आहे. विद्यार्थी व गृहिणींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे. उर्वरित 5 राशींसाठी मात्र दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:नारिंगी, शुभ अंक : २
आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. जशास तसे या धोरणाने वागा. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका.

वृषभ | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : १
अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. कठोर बोलण्याने नाती दूरावतील. आज क्षणिक मोहात अडकू नका.

मिथुन | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ४
जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपूरी स्वप्ने साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

कर्क | शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ३
उद्योग धंद्याच्या दृष्टीने अनूकुल दिवस असून नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक आदबीने वागतील. म्हणाल ती पूर्व.

सिंह | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ८
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतूकीचे नियम मोडू नका. दंड भरावा लागेल.

कन्या | शुभ रंग: हिरवा, शुभ अंक : ४
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना स्टंट नकोत.

तूळ | शुभ रंग: राखाडी, शुभ अंक : २
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

वृश्चिक | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ९
काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्याना स्पर्धेत यश मिळेल.

धनु | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ५
आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहीणी आज पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन

मकर | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
धंद्यात येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वत:चे महत्व सिध्द करू शकाल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल.

कुंभ | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ८
मोठे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. आज काही अयोग्य माणसे संपर्कात येतील. कुणी केलेल्या खोट्या स्तुतीने भारावून जाऊ नका. कायद्यात रहा.

मीन | शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ६
सर्व कामे सुरळीत पार पडतील. व्यवसायात आवक मुबलक असली तरी काही खर्चही समोर हात जोडून उभे असतील. विरोधकही आज मैत्रीसाठी हात पुढे करतील.

बातम्या आणखी आहेत...