आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • Aaj Che Rashifal (Horoscope Today) | Daily Rashifal (5 December 2022), Daily Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus, Gemini Cancer Libra, And Other Signs | Marathi News

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 5 डिसेंबरचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती परीघ नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. कामात अडथळे येऊ शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ४
महत्वाच्या चर्चेत इतरांचंही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान असावे. तुमचा लहरी व संशयी स्वभाव काबूत ठेवा.

वृषभ | शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ३
कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होईल सतर्क रहा. हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका.

मिथुन | शुभ रंग:नारिंगी, शुभ अंक : २
आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध रहा.

कर्क | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : १
नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टीकोन बाळगा. कर्तव्यास प्राधान्य द्या. वडील आज योग्य सल्ले देतील.

सिंह | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : २
नाेकरी धंद्यात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा, संयम ठेवा.

कन्या | शुभ रंग: हिरवा, शुभ अंक : ४
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला.आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

तूळ | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ८
सगळी महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागिदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

वृश्चिक | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ५
नोकरदारांवर वरीष्ठांची कृपादृष्टी राहील. कामाचे तास वाढवावे लागतील. आज तब्येत थोडी नरमच राहील. पतीपत्नीं मधील काही मतभेद सामंजस्याने मिटतील.

धनु | शुभ रंग:मोरपंखी शुभ अंक : ९
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वत:चे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

मकर | शुभ रंग:जांभळा शुभ अंक : ६
व्यापर उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देईल. आज मातोश्रींचे सल्ले महत्वपूर्ण असतील.

कुंभ | शुभ रंग:मरून शुभ अंक : ८
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृध्दीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहीणींना आज माहेरची ओढ लागेल.

मीन | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
धंद्यात येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. मृदु वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.

बातम्या आणखी आहेत...