आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 6 डिसेंबर रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या ग्रह स्थितीचा शुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ४
एखादी हरवलेली वस्तू गवसेल. आज तुम्ही स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्रखरेदी होईल.घरात थोरामोठ्यांच्या हो ला हो करा, वाद वाढवू नका.
वृषभ | शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ३
काही महत्वाची कामे दिवसाच्या उत्तरार्धात यशस्वी होतील. घरातून रागावून गेलेली एखादी व्यक्ती दुपारनंतर परत येईल. कुणालाही कसली वचने देऊ नका.
मिथुन | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : २
नोकरीच्या ठीकाणी आज वरीष्ठांच्या शाब्बासकीस पात्र व्हाल. नव्या व्यावसायिकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील. बेरोजगारांना आज मनासारख्या नोकरीचे प्रस्ताव येतील.
कर्क | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : १
उद्योगधंद्यात महत्वाचे निर्णय घेताना अनुभवींचे सल्ले अवश्य घ्या. घरगुती प्रश्न वडीलधाऱ्यांच्या मदतीने सहज सुटतील. आज वादापेक्षा सुसंवाद कामी येईल.
सिंह | शुभ रंग:नारिंगी, शुभ अंक : ५
वेळीच घेतलेले योग्य असे निर्णय आणि वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाची चाहूल लागेल. महत्वाकंक्षांच्या मागे धावताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होत अाहे. काळजी घ्या.
कन्या | शुभ रंग: हिरवा, शुभ अंक : ४
आज कोणतेही मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नका. कमी श्रमांत जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेही नितीबाह्य वर्तन आंगाशी येईल. कायद्याचे पालन करा.
तूळ | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ५
कार्यक्षेत्रात कामाचा प्रचंड ताण असून नोकरदारांना वरीष्ठांचे समाधान करणे अवघड जाईल. वैवाहिक जिवनांत संध्याकाळी काही किरकाेळ मतभेद होतील.
वृश्चिक | शुभ रंग:चंदेरी, शुभ अंक : ८
व्यापर उद्योगास पूर्ववत गती येईल. जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृध्दीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल.
धनु | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ९
कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देईल. आज मामा मावशीकडून काही शुभ समाचार येतील. पोट बिघडण्याची शक्यता.
मकर | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ८
व्यवसायात आज आवक मनासारखी राहील. नोकरीच्या ठीकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्विकारावी लागेल. बऱ्याच दिवसानी एखाद्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.
कुंभ | शुभ रंग:जांभळा शुभ अंक : ६
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिध्दीच्या झोतात येतील. गृहीणी शेजारधर्म जपतील.
मीन | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ७
नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. मुले अभ्यासाचा कंटाळाच करतील. जुन्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ अगदी मजेत जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.