आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवार 7 डिसेंबर रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती सिद्ध नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...
मेष | शुभ रंग:डाळींबी, शुभ अंक : ७
आज तुमचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल.गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहीणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.
वृषभ | शुभ रंग: तांबडा, शुभ अंक : ३
कार्यक्षेत्रात हितसंबंध निर्माण होतील. उपवरांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. इतरांच्या भानगडीत मध्यस्ती कराल.
मिथुन | शुभ रंग:मरून, शुभ अंक : २
खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.
कर्क | शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ७
पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.
सिंह | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ९
नोकरदारांना वरीष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची तुमची आज तयारी असेल.
कन्या | शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ८
उद्योग धंद्याच्या दृष्टीने थोडासा विराेधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार अाहे.
तूळ | शुभ रंग:लाल, शुभ अंक : ६
फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. आज भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी दिवस योग्य नाही. गाडी हळूच चालवा.
वृश्चिक | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ५
आज वैवाहीक जिवनांत गोडीगुलाबी असणार आहे. महत्वाच्या घरगुती प्रश्नांत जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौसमौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.
धनु | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : १
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.
मकर | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ३
आज हौस मौज करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.
कुंभ | शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ४
स्थावर शेती वाडी संबंधीत काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहीणींना आज माहेरची ओढ लागेल.
मीन | शुभ रंग: जांभळा, शुभ अंक : २
आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.