आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपावली:ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीत सूर्य-चंद्र एका अक्षांशावर आल्यावर येतो दीपावली-लक्ष्मी आवाहनाचा पवित्र योग; प्रभू श्रीरामांच्या नावाचीही सूर्य, चंद्र अन् अग्नी मिळून झाली निर्मिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपत्ती, वैभव, शेती, पशुधन, धान्यसंपदा, अपत्य-सेवक, कौटुंबिक सुख, कीर्ती, लौकिक याच्या उपभोगाचे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्य-दीर्घायुष्यासाठी श्रीच्या माध्यमातून लक्ष्मीला आवाहन केले जाते...

सनातन सांस्कृतिक परंपरेनुसार दीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तर, अशीही एक श्रद्धा आहे की, श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवल्यानंतर याच दिवशी अयोध्येत दाखल झाले होते. मग प्रश्न निर्माण होतो की, प्रभू श्रीराम आणि माता लक्ष्मी यांच्यात शास्त्रानुसार काय संबंध आहे? व्यापारी याच दिवशी आपल्या वही-खात्याची पूजा का करतात?

माता लक्ष्मी आणि श्रीरामांदरम्यान असलेल्या संबंधांचा विचार करता यात सूर्य आणि चंद्राचा संबंध येतो. श्रीरामचरितमानसाच्या बालकांडमधील १८व्या दोह्यानंतर पहिल्या चौपाईत राम या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे.
बंदउँ नाम राम रघुबर को।
हेतु कृसानु भानु हिमकर को।।
बिधि हरि हरमय बेद प्रान सो।
अगुन अनूपम गुन निधान सो।।

अर्थात कृशानू (अग्नी), भानू (सूर्य) आणि हिमकर (चंद्र) याच्या संयोगाच्या रुपाने “र’ आणि “म’ या अक्षरात वसलेल्या श्रीरघुनाथाच्या “राम’नामाचे पूजन आम्ही करतो. हे रामनाम ब्रह्मा, विष्णू आणि शिवस्वरूप आहे. हाच वेदांचा प्राण आहे; निर्गुण, निराकार अशा गुणांचे भांडार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र ज्या दिवशी तूळ राशीत एकाच अक्षांशावर येतात त्या दिवशी दीपावली साजरी केली जाते. ही अमावास्येची रात्र असते. या राशीचे चिन्ह तराजू असल्याने व्यापारी जुना व्यवहार पूर्ण करून नव्या आर्थिक वर्षासाठी शुभ-लाभासाठी वहीखात्याची पूजा करतात.

याच कारणामुळे श्रीरामाचा संदर्भ दिवाळीशी जोडण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य हे आत्मा आणि तप याचे प्रतीक आहे आणि चंद्र हा मन, लाभ तसेच सुखाचा सूचक आहे. हे दोन्ही एकाच अक्षांशावर आले म्हणजे मन आणि आत्मा, श्रम आणि लाभ यांच्यात समतोल असल्याचे मानले जाते. जगभरात जुन्या वित्तीय वर्षाची अखेर आणि नववर्षाची सुरुवात दिवाळीच्या दिवशी होते. जगभरातील नवीन वित्तीय वर्षाची संकल्पना हीच आहे. आपण वैदिक परंपरेनुसार ज्ञानमार्गावर विश्वास ठेवत असाल तर दीपावली हा ज्योतिष गणिताचाही एक उत्सव आहे.

अग्नीला सूर्याच्या शक्तीचे रूप मानले जाते आणि ऋग्वेदातील पहिला मंत्र अग्नीलाच समर्पित आहे. या मंत्रात अग्नीला जीवनासह देवतांना आवाहन करणाऱ्या प्रत्येक यज्ञाचा पुरोहित मानले गेले आहे. ऋग्वेदाच्याच परिशिष्ट सूक्ताच्या खिलसूक्तात श्रीसूक्त सामावलेले आहे. याला लक्ष्मीसूक्तही संबोधले जाते. अग्नीच्या माध्यमातून श्रीलक्ष्मीला आवाहन करण्यासाठी श्रीसूक्ताचे पाठ केले जातात. श्री ही ऐहिक देवता आहे. या देवतेच्या शक्तीला लक्ष्मी म्हणतात. संपत्ती, वैभव, शेती, पशुधन, धन-धान्य-संपदा, अपत्य, सेवक, कौटुंबिक सुख, कीर्ती, लौकिक याच्या उपभोगाचे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी तसेच दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी श्रीच्या माध्यमातून दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते.

हरिः ॐ। हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥

श्रीसूक्ताच्या या पहिल्या मंत्रातच श्री लक्ष्मीने सूर्य व चंद्र ही आभूषणे एकत्र परिधान केल्याचे संबोधण्यात आले आहे. वेद-पुराण व रामायण मिळून एक समान अर्थ सांगतात, त्यानुसार सनातन संस्कृतीचा आधार अंक, अक्षर, गणित, काव्य, ज्ञान आणि विज्ञान आहे. दीपावली हा या भावनेचा जिवंत उत्सवही आहे.

बातम्या आणखी आहेत...