आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तिथी :22 एप्रिलला आमावस्या, चंद्राची सोळावी कला आहे 'अमा', यामध्ये राहते सर्व कलांची शक्ती

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • अमावस्येला घरातच पवित्र नद्यांचे स्मरण करत स्नान करावे आणि पितरांसाठी दान-पुण्य

बुधवार, 22 एप्रिलला चैत्र मासातील अमावस्या आहे. यावेळी पंचांग भेदामुळे काही ठिकाणी गुरुवारी अमावस्या  तिथी मानली जाईल. हिंदू पंचांगामध्ये एक महिन्याला 15-15 दिवसांच्या दोन पक्षांमध्ये विभागण्यात आले आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये चंद्राची कला पूर्ण रूप घेते आणि कृष्ण पक्षात चंद्राच्या कला कमी होतात यामुळे अमावास्येला चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो. धर्मग्रंथामध्ये चंद्राच्या सोळाव्या कलेला 'अमा' सांगण्यात आले आहे. 


स्कंद पुराणातील श्लोकानुसार 

अमा षोडशभागेन देवि प्रोक्ता महाकला। 

संस्थिता परमा माया देहिनां देहधारिणी ।। 

अर्थ - चंद्रमंडळातील अमा नावाची महाकला आहे, ज्यामध्ये चंद्राच्या सोळा कलांची शक्ती आहे. या शक्तीचा क्षय आणि उदय होत नाही.


केव्हा येते अमावस्या 

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र ज्या दिवशी एकत्र असत त्या दिवशी अमावस्या असते. या दिवशी हे दोन्ही ग्रह एकत्र एकाच राशीमध्ये असतात म्हणजेच या दिवशी दोन्ही ग्रहांचे मिलन होते. 22 एप्रिलला सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह एकत्र मेष राशीमध्ये राहतील. शास्त्रामध्ये अमावस्या तिथीचे स्वामी पितृदेव यांना मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण, दान-पुण्य करण्याचे महत्त्व आहे.

0