आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक मास बुधवारी संपणार:अमावस्या तिथीचे स्वामी आहेत पितृ देवता, या दिवशी सूर्य-चंद्र एकाच राशीत

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 23 नोव्हेंबरला कार्तिक मासातील अमावस्या आहे. त्यानंतर 24 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरु होईल.अमावस्येचे स्वामी पितर देवता मानले गेले आहेत. त्यामुळे या तिथीला पितरांसाठी धूप-ध्यान करण्याची परंपरा आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार,पंचांगात 15-15 दिवसांचे दोन पक्ष असतात- शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. कृष्ण पक्षात चंद्राच्या कला कमी होतात आणि अमावस्येला चंद्र पूर्णपणे दिसत नाही. शुक्ल पक्षात चंद्राच्या कला वाढतात म्हणजेच चंद्र वाढतो आणि पौर्णिमेला चंद्र पूर्ण आकारात दिसतो.

चंद्राची सोळावी कला आहे अमा
चंद्राच्या एकूण सोळा कला आहेत आणि सोळाव्या कलाचे नाव अमा आहे. ही कला अमावस्येला राहते. असे मानले जाते की चंद्राच्या इतर सर्व 15 कलांची शक्ती अमा कलाकडे आहे आणि या काळाचा क्षय होत नाही.

अमावस्येला सूर्य आणि चंद्र एकाच राशीत
अमावस्याचा संबंध चंद्राबरोबरच सूर्याशी आहे. या तिथीला सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात. 23 नोव्हेंबरला हे दोन्ही ग्रह वृश्चिक राशीत राहतील. या दिवशी चंद्रासोबत सूर्यदेवाची विशेष पूजा करावी. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करावी. भगवान शिवासोबतच भगवानांच्या मस्तकावर असलेल्या चंद्राची पूजा करावी.

अमावस्येला करू शकता हे शुभ कार्य
अमावस्येला शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि दिवा लावून ऊँ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. रुद्राक्षाच्या माळेने मंत्राचा जप करावा.
हनुमानासमोर दिवा लावून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पाठ करावा.
बुधवारी श्रीगणेशाचा अभिषेक करावा. दुर्वा अर्पण कराव्यात. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. दिवा लावून आरती करावी. गणेशाच्या श्री गणेशाय नमः मंत्राचा जप करावा.

बातम्या आणखी आहेत...