आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवीन वर्ष 2021 सुरु झाले आहे. यावर्षी देवगुरु बृहस्पतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम राहील. 23 जानेवारीनंतर संपूर्ण जगात कोरोनावर नियंत्रण मिळू लागेल. भारताला चीन आणि पाकिस्तानमुळे सीमेवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. देशातील 4 ज्योतिषाचार्य सांगत आहेत, 2021 देशातील राजकारण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रासाठी कसे राहील...
राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपचा दबदबा राहण्याची आशा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राशी वृश्चिक असून यावर देवगुरु बृहस्पती यांची कृपा राहील. यांचा आत्मविश्वास शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर मोदी यश प्राप्त करतील. यासोबतच आपल्या व्यक्तिमत्वाने ते लोकांना प्रभावित करतील. यांच्या कुंडलीत बृहस्पती केंद्रात असणे आणि मंगळ स्वतःच्या राशीमध्ये असल्यामुळे मोदी योग्य पद्धतीने यवस्थापन करू शकतात. या वर्षात देशातील राजकारणात महत्त्वपूर्ण परिवर्तन आणि घटनाक्रम घडू शकतात.
जनतेचा कारक ग्रह शनि आहे. हा ग्रह केंद्रात असून बृहस्पतीची यावर दृष्टी राहील. यावर्षी राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा प्रभाव वाढेल. काँग्रेससाठी हे वर्ष विशेष राहणार नाही. वर्ष 2024 मध्ये शनीच्या साडेसाती काळात मोदींच्या कुंडलीत मंगळ असल्यामुळे यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसण्याची संधी मिळेल.
- नस्तुर बेजान दारुवाला (ज्योतिषाचार्य, अहमदाबाद)
काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या दोन-तीन मोठ्या घटना होऊ शकतात
नवीन वर्ष भारताच्या दृष्टीने अत्यंत खास राहणार आहे. यावर्षी भारत-चीनमधील तणाव वाढू शकतो. दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु युद्ध होणार नाही. एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये परिस्थिती तणावपूर्ण राहील, या काळात युद्ध होण्याची शक्यता आहे. यावर्षी पाकिस्तानचे जास्त नुकसान होऊ शकते. जॅम-काश्मीरमध्ये दहशतवाद नियंत्रणात राहील. दोन-तीन मोठ्या घटना होऊ शकतात. परंतु परिस्थिती नियंत्रणात राहील. नक्सल तणाव वाढू शकतो.
विदेश नितीमध्येही भारतासाठी हे वर्ष आव्हानात्मक राहू शकते. परंतु शेजारील देशांसोबत संबंध आणि कूटनीतीमध्ये भारत विशेष यश प्राप्त करू शकतो. भारताची विदेश नीती चीन, नेपाळ, भूटान, म्यानमार आणि बांगलादेशासोबत उल्लेखनीय राहील.
- डॉ. कुमार गणेश (न्यूमेरोलॉजिस्ट, जयपुर)
विद्यार्थ्यांसाठी यशदायी, जानेवारीनंतर कोरोनावर मिळेल नियंत्रण
2020 मध्ये कोरोनामुळे देशाचे शिक्षण क्षेत्रात खूप नुकसान झाले आहे. याची भरपाई 2021 मध्ये होईल. हे वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण राहील. नवीन वर्षात आई-वडील, शिक्षण आणि संचालन करणाऱ्या सर्व लोकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होऊ शकते.
महामारी कोरोना जानेवारी 2021 नंतर नियंत्रणात येऊ लागेल. ज्योतिषनुसार शनि उत्तराषाढा नक्षत्रामध्ये आल्यानंतर सर्वांना त्रस्त करतो. उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. सूर्य शनीचा शत्रू ग्रह आहे. यामुळे जेव्हापासून सूर्याच्या नक्षत्रामध्ये शनीचा प्रवेश झाला आहे तेव्हापासून जगभरात महामारी सुरु झाली आहे. 23 जानेवारीला शनि उत्तराषाढा नक्षत्रामधून निघून श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. यानंतर जगभरात पसरलेली महामारी आणि अशांती नष्ट होऊ लागेल.
- पं. मनीष शर्मा (ज्योतिषाचार्य, उज्जैन)
सरकारचे उत्पन्न आणि बेरोजगारांची संख्या, दोन्हीही वाढण्याचे योग
नवीन वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत विशेष असा सुधार होण्याचे योग नाहीत. यावेळी आर्थिक संकटामुळे जनता अशांत राहील. बेरोजगारांची संख्या आणखी वाढेल. शेअर बाजार लाभाची कमी राहील. बँकांमध्ये भ्रष्टाचार वाढेल. काही विमा कंपन्यांसाठी हा काळ ठीक नाही. विदेशी मुद्रा भंडार वाढेल आणि रुपया मजबूत होईल. सरकारचे उत्पन्न वाढेल.
देशाचा व्यावसायिक तोटा कमी होईल. परदेशी गुंतवणुकीतून फायदा मिळेल. भारतीय बाजारात त्यांची रुची राहील. वर्षाच्या सुरुवातील शेअर बाजारात मंदी राहण्याचे योग आहेत. ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, सॉफ्टवेअर, सिमेंट, स्टील सर्व शेअरमध्ये मंदी राहील. वर्षाच्या शेवटी जागतिक बाजारात भारताची भागीदारी वाढेल, ज्यामुळे येणाऱ्या काळात देशाला फायदा होऊ शकतो.
-पं. गणेश मिश्रा (ज्योतिषाचार्य, काशी)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.