आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
खगोलशास्त्राच्या बाबतीत 14 ते 20 जुलै हा कालावधी खूप खास ठरणार आहे. या सात दिवसात 3 मोठ्या खगोलीय घटना घडत आहेत. 14 जुलैच्या रात्री सूर्य आणि गुरु यांच्यात पृथ्वी येईल. याला ज्युपिटर अॅट अपोझिशन असे म्हटले जाते. 2020 च्या आधी 2000 मध्ये ही घटना घडली होती. पुढे 2040 मध्ये अशी स्थिती पुन्हा होईल.
भोपाळच्या विज्ञान प्रसारक आणि खगोलीय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सारिका घारू यांनी सांगितले की, जेव्हा पृथ्वी इतर ग्रह आणि सूर्यादरम्यान एका सरळ रेषेत येते तेव्हा याला अपोझिशन म्हटले जाते. पृथ्वी 365 दिवसांत सूर्याची एक परिक्रमा करते आणि या एका वर्षात सर्व ग्रहांसोबत पृथ्वीची अशी स्थिती निर्माण होते. मात्र केवळ सात दिवसांत गुरू, शनि आणि प्लूटो या तीन ग्रहांसोबत ही स्थिती बनणे दुर्मिळ योग आहे.
14 जुलैच्या रात्री सूर्य, पृथ्वी आणि गुरु एका रेषेत असतील
14 जुलै रोजी दुपारी 1.16 वाजेनंतर गुरू, पृथ्वी आणि सूर्य एका रेषेत येण्यास सुरूवात होईल. यावेळी गुरू आणि सूर्य दोघांत पृथ्वी असेल. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर 7.43 वाजता पूर्व दिशेला गुरू ग्रह दिसेल. रात्री 12.28 वाजता, गुरू ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. दुर्बिणीच्या सहाय्याने, गुरु ग्रह आणि त्याच्या चार चंद्रांना पाहता येईल. 15 जुलै रोजी सकाळी 5.09 वाजता हा ग्रह दिसणे बंद होईल.
16 जुलैच्या सकाळी सूर्य आणि प्लूटो ग्रहाच्या मध्ये पृथ्वी येणार आहे. या दिवशी सकाळी 7.47 वाजत ही खगोलिय घटना पाहता येईल. यावेळी प्लूटो, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असतील.
20 जुलैच्या रात्री सॅटर्न अॅट अपोझिशन
20-21 जुलैच्या मध्यरात्री 3.44 वाजता सूर्य, पृथ्वी आणि शनि ग्रह एका सरळ रेषेत येतील. 2000 मध्ये देखील गुरू आणि शनिची ही स्थिती बनली होती. त्यावेळी 19 नोव्हेंबर रोजी सॅटर्न अॅट अपोझिशनची घटना घडली होती. आणि 28 नोव्हेंबर रोजी ज्युपिटर अॅट अपोझिशन झाले होते. तेव्हा या घटनांमध्ये 9 दिवसांचे अंतर होते. भविष्यात 2040 मध्ये या घटना पुन्हा होणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.